पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारासाठी रुग्णालयात

सोनिया गांधी

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, नियमित आरोग्य तपासणीकरिता (रुटीन चेकअप)  त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्यासह राहुल गांधीही रुग्णालयात पोहोचले आहेत. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते रुग्णालयात येणार असल्याचे समजते. सोनिया गांधी यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती गांधी कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.   

अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाच्या भावाची निर्घृण हत्या

७३ वर्षीय सोनिया गांधी मागील काही वर्षांपासून प्रकृती अस्वस्थामुळं त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांची राजकीय सक्रियता देखील पूर्वीसारखी दिसत नाही. निवडणूक प्रचारामध्येही त्या फार कमी वेळा सहभागी होताना पाहायला मिळाले आहे. लोकसभेतील काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर कार्यवाहू अध्यक्षा म्हणून त्यांनी काँग्रेसची जबाबदारी पुन्हा आपल्या हाती घेतली आहे. सर्वाधिक काळ काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहण्याचा विक्रम हा सोनिया गांधी यांच्या नावे आहे.