पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA अन् NRC च्या विरोधात काँग्रेस दिल्लीत धरणे आंदोलन करणार

राहुल गांधी आणि सोनिया गांधी

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात काँग्रेस पक्ष रविवारी धरणे आंदोलन पुकारले आहे. काँग्रेस दिल्ली येथील राजघाटवर हे आंदोलन करणार आहे. यात पक्षाचे दिग्गज नेतेही सहभागी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी शनिवारी काँग्रेस नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना पाठिंबा देत काँग्रेस केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात आंदोलन करणार आहे. 

CAA : कानपूरमध्ये पोलीस चौकीसह वाहने जाळल्याची घटना

दिल्लीत होणाऱ्या या आंदोलनामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी तसेच अन्य दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. सुधारित नागरिकत्व कायदा हा  घटनात्मक नसल्याचे सांगत सुरुवातीपासूनच काँग्रेस याला विरोध करत आहे. 

तत्पूर्वी प्रियांका गांधी यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि नागरिकत्व नोंदणी हा प्रकार राज्यघटनेच्या विरोधात आहे. या कायद्याच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्यासाठी सरकार हुकुमशाही करत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा कायदा  गरिबांसाठी अन्यायकारक असल्याचा उल्लेखही प्रियांका गांधी यांनी केलाय. 

CAA कायद्यासंदर्भातील जनजागृतीसाठी BJP राबवणार ही विशेष मोहीम

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात ईशान्य भारतातील लोण हे जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आदोलनानंतर दिल्लीत तापले. त्यानंतर या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले.  दिल्ली पोलिसांनी जामिया विद्यापीठात घुसून केलेल्या कारवाईच्या विरोधात देखील प्रियांका गांधी यांनी दिल्लीतील इंडियागेटवर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. देशभरात अनेक ठिकाणी या कायद्याविरोधात संतप्त भावना उमटत असताना विरोधक जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे.