पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यसभेत NDAची स्थिती आणखी मजबूत, काँग्रेसचे नेते भाजपत

संसद

कर्नाटकमधून काँग्रेसकडून राज्यसभेत गेलेले के सी राममूर्ती यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे सरचिटणीस भूपेंद्र यादव, अरूण सिंह यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. राममूर्ती यांनी आधीच राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यसभेत काँग्रेसचे बळ आणखी कमी झाले. दुसरीकडे भाजप आणि मित्रपक्षांची राज्यसभेतील स्थिती आणखी मजबूत झाली आहे.

पीएमसी बँकेच्या खातेधारकांचे आझाद मैदानावर आंदोलन

राज्यसभेत विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसची सदस्यसंख्या आता ४५ झाली आहे. त्याचवेळी भाजपची या सभागृहातील सदस्यसंख्या ८३ होणार आहे. अनेक राज्यांमध्ये आता भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे या राज्यांतून राज्यसभेत निवडून जाणाऱ्या प्रतिनिधींमध्ये भाजपचाच वरचष्मा असणार आहे. राज्यसभेत सध्या पाच जागा रिक्त आहेत.

नोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...

भाजप आणि त्यांच्यासोबत असलेले मित्रपक्षांची संख्या मिळून हा आकडा १०६ इतका झाला आहे. त्याचवेळी भाजपला बाहेरून पाठिंबा देणारे अण्णाद्रमुकचे ११, बिजू जनता दलाचे ७, तेलंगणा राष्ट्र समितीचे ६, वायएआर काँग्रेसचे २ आणि अन्य प्रादेशिक पक्षांचे तीन सदस्य राज्यसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पाठिशी आहेत. 

मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे राज्यसभेत बहुमत नव्हते. त्यामुळे तिहेरी तलाक विरोधी विधेयकासह अन्य विधेयक मंजूर करून घेण्यात भाजपला अडचणी आल्या होत्या.