पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली निवडणूकः राजीव सातव यांच्यावर काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी

राजीव सातव

झारखंड विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष दिल्ली विधानसभा निवडणूकीकडे लागले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या छाननी समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राच्या नेत्याची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार राजीव सातव यांची दिल्लीच्या छाननी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

 

खातेवाटपावरून काँग्रेस नेत्यांची नाराजी उघड, मुख्यमंत्र्यांना साकडे
 
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने छाननी समितीची स्थापना केली आहे. पक्ष संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या छाननी समितीच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. राजीव सातव या छाननी समितीच्या अध्यक्षपदी असणार आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभेसाठीच्या काँग्रेसकडून तिकीट वाटपाची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

...अन आदेश मिळताच जाळून टाका; काँग्रेस नेत्याचा तो व्हिडिओ

दिल्ली विधानसभेचा कालावधी १५ फेब्रुवारी २०२० मध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागा आहेत. दिल्ली विधानसभेवर सध्या आम आदमी पार्टीची सत्ता आहे. 

विस्डेनच्या टॉप ५ क्रिकेटर्समध्ये विराट कोहली