पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मध्य प्रदेशः काँग्रेसने शिवराजसिंह यांच्या घरी कर्जमाफीचे पुरावेच नेले

काँग्रेसने शिवराज सिंह चौहान यांच्या घरी जाऊन कर्जमाफीची कागदपत्रे दिली (Twitter Congress)

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन मध्य प्रदेशमध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरु आहे. यादरम्यान काँग्रेसचे काही नेते मंगळवारी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या घरी जाऊन त्यांच्या हाती कर्जमाफी झालेल्या राज्यातील २१ लाख शेतकऱ्यांच्या नावांची यादीच दिली. या सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

'प्रज्ञासिंह यांच्या प्रचारानंतर शिवराजसिंह यांना आंघोळ करावी लागत नाही ना?'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते खुल्या जीपमध्ये शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या घेऊन शिवराज सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी त्यांच्याकडील २१ लाख शेतकऱ्यांची नावेच दिली. ही यादी जिल्हावार आहे.

यावेळी पचौरी म्हणाले की, राज्यात काँग्रेस सरकारने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना दोन लाख पर्यंतचे कर्ज माफ करण्याचे वचन दिले होते. कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने सत्ता हाती घेताज कर्जमाफीची प्रक्रिया सुरु केली. या शेतकऱ्यांची यादी आणि पेन ड्राईव्ह शिवराज सिंह यांना सोपवला आहे. 

‘जय जवान-जय किसान कर्ज माफी’ योजने अंतर्गत एकूण ५५ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी सुमारे २१ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले आहे. त्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे.