पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जे पाकिस्तान करत आले तेच आता काँग्रेस करतंय : PM मोदी

नरेंद्र मोदी

नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन ईशान्येकडील राज्यांमध्ये आंदोलन पेटले असताना पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भाष्य केले. कालपर्यंत ज्या गोष्टी पाकिस्तानकडून व्हायच्या त्या आता काँग्रेसकडून सुरु आहेत, अशा शब्दांत त्यांनी या कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस ज्या प्रमाणे देशात आग लावत आहे त्यावरून नागरिकत्व कायद्यासंदर्भातील आमच्या सरकारने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध होते, असेही ते म्हणाले. 

प्रशासनाचा अनुभव नसला तरी आत्मविश्वासाची कमी नाही: CM उद्धव ठाकरे

झारखंडच्या दुमका येथे आयोजित प्रचारसभेत त्यांनी नागरिकत्व कायद्यासंदर्भातील मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर तोफ डागली.  काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी नागरिकत्व कायद्यावरुन विनाकारण वादंग निर्माण करण्याचे काम केले. आग लावणारे कोण आहेत? हे त्यांच्या कपड्यांवरूनच माहीत दिसून येते. काँग्रेसकडून देशहिताची कोणतीच आशा करता येणार नाही, असा टोलाही मोदींनी यावेळी लगावला. 

स्थगिती सरकारमुळे महाराष्ट्र ठप्प, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष जाळपोळ करणाऱ्यांचे अप्रत्यक्षपणे समर्थन करत आहेत. हिंसेकडे कानाडोळा करण्याची त्यांची भूमिका देशवासियांना समजली आहे. त्यामुळे आमच्या सरकारने घेतला निर्णय देशहितासाठी योग्य असल्याचे सिद्ध होते, असेही मोदी यावेळी म्हणाले. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहेत. या देशांमधील हिंदू , ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि बौद्धांना शरणार्थी म्हणून तिथं राहावं लागत आहे, अशा लोकांना आम्ही नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. यावरही त्यांनी जोर दिला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Congress does what Pak has been doing for long PM Modi on protests outside Indian embassies