पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा निवडणुकीत 'वंचित'ला बरोबर घेण्यासाठी काँग्रेसची दिल्लीत खलबतं

प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसची शनिवारी दिल्लीत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीशी आघाडी करण्याबाबत चर्चा झाल्याचे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला मोठा फटका बसला होता. त्यामुळे काँग्रेसने सावध भूमिका घेतल्याचे दिसते. 

विधानसभेच्या सर्व २८८ जागा वंचित आघाडी लढवणारः प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील नेत्यांबरोबर राहुल गांधी यांची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत राज्यातील नेतृत्व बदलाची चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात येते. याचाच अर्थ विधानसभा निवडणुका या विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाण्याची शक्यता आहे.

शरद पवार राष्ट्रीय नव्हे तर बारामतीचे नेतेः प्रकाश आंबेडकर

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना माणिकराव ठाकरे म्हणाले की, येत्या ३ जुलैला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी पहिली बैठक निश्चित झाली असून त्यादिवशी त्यांचा प्रस्ताव आणि त्यांचे म्हणणे जाणून घेतले जाणार आहे. समविचारी पक्षांनी एकत्र लढले पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका आहे. वंचित बरोबर आघाडी करण्याबाबतचे सर्व अधिकार हे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ३ जुलैच्या बैठकीला हर्षवर्धन पाटील आणि ठाकरे हे स्वतःही उपस्थितीत राहणार आहेत.

राष्ट्रवादीचे १० आमदार संपर्कात असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा