पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'एक देश, एक निवडणूक'वर मोदी सरकारने संसदेत चर्चा करावीः काँग्रेस

सोनिया गांधी आणि राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक देश, एक निवडणूक' आणि इतर मुद्द्यांवर बुधवारी बोलवण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस सहभागी झाली नाही. सरकारला निवडणुकीत सुधारणा करायची असेल तर त्यांनी संसदेत या विषयावर चर्चा करावी, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसचे खासदार गौरव गोगई यांनी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यावरुन भाजपवर दुहेरी मापदंड वापरत असल्याचा आरोप केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना बैठकीत सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. पण ते यात सहभागी झाले नसल्याची माहिती त्यांनी दिली. 

'एक देश, एक निवडणूक'वरून राजकीय पक्ष विभागलेले, बैठकीकडे अनेकांची पाठ

गोगई यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, निवडणूक प्रक्रियेत सुधारणा व्हावी असे आम्हालाही वाटते. आम्ही गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी एकत्रित पोटनिवडणुका घेण्याची मागणी केली आहे. मतपत्रिकेद्वारे मतदान व्हावे. या निवडणुकीत वारेमाप पैसे खर्च झाल्याचा मुद्दा आम्ही उपस्थितीत केला आहे. पण अडचण ही आहे की, पंतप्रधान विरोधकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करतात.

एक राष्ट्र, एक चुनाव संविधानाशी निगडीत विषय आहे. जर सरकारला निवडणुकीत सुधारणा करायची असेल तर ते यावर संसदेत चर्चा करु शकतात.

मोदींच्या 'एक देश एक चुनाव'ला नवीन पटनाईकांचे समर्थन

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Congress Demands discussion on one nation one Election theory after skip all party meeting