पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसला आणखी एक धक्का, मुख्य प्रतोदांचा राजीनामा

काँग्रेसचे मुख्य प्रतोद भुवनेश्वर कलिता

जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय केंद्रातील भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारने सोमवारी घेतला. या निर्णयाविरोधात बोलणारे जे राजकीय पक्ष आहेत. त्यामध्ये काँग्रेस हा प्रमुख राजकीय पक्ष. पण याच पक्षाच्या राज्यसभेतील मुख्य प्रतोदांनी सोमवारी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. 

हा क्रांतीकारक नव्हे तर राजकीय निर्णयः सोली सोराबजी

काँग्रेसचे राज्यसभेतील मुख्य प्रतोद भुवनेश्वर कलिता यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्यसभेचे सोमवारचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच भुवनेश्वर कलिता यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भुवनेश्वर कलिता हे राज्यसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद होते. राज्यसभेतील पक्षाच्या सदस्यांसाठी व्हीप काढण्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती. पक्षाने व्हीप काढल्यानंतर त्यानुसारच सदस्यांना मतदान करावे लागते.

भुवनेश्वर कलिता हे २००४ ते २०१४ आसाम प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहिले होते. पण काही काळ ते पक्षाच्या प्रदेश शाखेमध्येच एकाकी पडले होते. सोमवारी राजीनामा दिल्यावर लगेचच त्यांनी मी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, अशा आशयाचे ट्विट केले.

भुवनेश्वर कलिता पुढे काय करणार, कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसने कलम ३७० संदर्भात घेतलेल्या भूमिकेला भुवनेश्वर कलिता यांचा विरोध होता. त्यामुळेच त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे भाजपचे काही नेते सांगत आहेत. 

जम्मू-काश्मीरचे कलम ३७० हटविण्याचा निर्णय साहसी - संघ

कलिता यांच्या नावाने एक निवेदन सध्या सोशल मीडियावर फिरते आहे. पण त्यावर त्यांची स्वाक्षरी नाही. या निवेदनावर म्हटले आहे की देशातील जनतेच्या ज्या भावना आहेत. त्याविरोधात काँग्रेस भूमिका घेत आहे. त्यामुळे मी माझ्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. पण यासंदर्भात भुवनेश्वर कलिता यांच्याशी संपर्क साधण्याचा हिंदुस्थान टाइम्सच्या प्रतिनिधीने प्रयत्न केला. पण ते उपलब्ध झाले नाहीत.