देशातील आर्थिक मंदी आणि शेतीविषयक संकटाच्या मुद्यावरुन केंद्र सरकारला घेराव घालण्यासाठी काँग्रेसने शनिवार ४ नोव्हेंबर रोजी सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत काँग्रेसच्या प्रस्तावित १० दिवसांच्या देशव्यापी आंदोलनावर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये आर्थिक मंदी, शेतीविषयक संकट या मुद्द्यांवरुन विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे आणि पुढची योजना आखली जाणार आहे.
Congress calls a meeting of opposition parties on 4th Nov, seeking their support on its 10-day nationwide agitation targeting the Central Govt over issues of "economic slowdown, agrarian distress, unemployment & the proposed Regional Comprehensive Economic Partnership agreement". pic.twitter.com/cl0vQs6aMY
— ANI (@ANI) November 2, 2019
शरद पवार मुंबईत, राजकीय हालचालींना वेग
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, सरकार आर्थिक मंदीच्या मुद्द्यावरुन सरकारला घेराव घालणार आहे. विशेषत: ग्रामीण भागात घेराव घालेल. कारण महाराष्ट्र आणि हरियाणा येथे काही भागात झालेल्या निवडणुकांमध्ये या विषयाचा परिणाम झाला आहे. याचाच परिणाम म्हणजे भाजप स्वबळावर बहुमतापासून दूर राहिली आहे. दरम्यान, हरियाणामध्ये दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाच्या मदतीने सरकार स्थापन करण्यात भाजपला यश आले. मात्र महाराष्ट्रातले चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दिल्लीत पोलिस आणि वकिलांमध्ये हाणामारी, काही जण जखमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या थायलंड दौऱ्यावर गेले असता काँग्रेसने विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मोदी थायलंडमध्ये आरसीईपी शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले आहेत. त्याठिकाणी ते सदस्य देशांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी सांगितले की, काँग्रेस आरसीईपीच्या विरोधात आहेत कारण ते भारतीय अर्थव्ववस्थेसाठी चांगले नाही.