पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मोदी सरकारचा कारभार अंधेर नगरी चौपट राजा'सारखाः सोनिया गांधी

सोनिया गांधी

दिल्लीतील रामलीला मैदानावरुन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकारमुळे आज देशात अंधेर नगरी चौपट राजासारखी स्थिती निर्माण झाली असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसच्या देश बचाओ रॅलीत बोलताना त्या म्हणाल्या की, सबका साथ, सबका विकास कोठे आहे?, ज्या काळ्या पैशासाठी नोटबंदी केली होती. तो काळा पैसा बाहेर का आला नाही?, याची चौकशी झाली पाहिजे की नाही, असा सवाल करत, देशातील युवक नोकरीसाठी भटकत आहे. हातातल्या नोकऱ्याही जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

सोनिया गांधी यांनी कलम ३७० आणि नागरिकत्व कायद्यावरुन भाजप आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला. सध्या देशात कोणताही कायदा आणा आणि कोणताही कायदा लागू करा, कधीही राष्ट्रपती शासन आणा आणि हटवा, असे चालू आहे. कोणत्याही चर्चेविना कोणताही कायदा मंजूर केला जात आहे. दररोज संविधान उद्ध्वस्त केले जात आहे. या नव्या नागरिकत्व कायद्यामुळे भारताचा आत्मा नष्ट होईल, याची पर्वाच मोदी-शहा जोडीला नाही.

मी मरण पत्करेल पण माफी मागणार नाही: राहुल गांधी

महागाईवर बोलताना त्या म्हणाल्या की, महिलांनी किती संघर्ष करावा लागतोय. दररोज लागणाऱ्या वस्तूंच्या किंमती आवाक्याबाहेर गेल्याने त्यांची झोप उडाली आहे. ज्या पद्धतीने आज अन्याय आणि दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते पाहून मान शरमेने खाली जात आहे.

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:congress bharat bachao rally sonia gandhi slams on modi government Citizenship Act manmohan singh Rahul Gandhi