पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली पेटवण्यामागे काँग्रेसचा हात, रामदास आठवलेंचा आरोप

दिल्ली पेटवण्यामध्ये काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोप आठवले यांनी केला आहे.

देशाच्या राजधानीत सुरु असलेल्या हिंसाचारात काँग्रेसचा हात आहे, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना दिल्लीमध्ये उसळलेल्या दंगलीची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.  पंढरपूर येथे संतांच्या मेळाव्यानिमित्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

हिंसक आंदोलनानंतर धगधगत्या दिल्लीची जबाबदारी या अधिकाऱ्याकडे

यावेळी आठवले म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत-अमेरिका यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी त्यांचा दौरा महत्त्वपूर्ण आहे. या दौऱ्याच्यावेळीच दिल्लीतील आंदोलनाला हिंसक वळण लागले. दिल्ली पेटविण्याचे  काम हे काँग्रेसनेच केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या काळातही भारत-अमेरिका यांचे चांगले संबंध संबंध होते. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौऱ्यात दिल्लीतील झालेला हा प्रकार निंदणीय असून दिल्लीमध्ये झालेल्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई व्हायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.  

 'शिवसेना-भाजपने पुन्हा एकत्र यावे, आपण मिळून सरकार स्थापन करु'

दिल्लीतील शाहिन बागमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनानंतर जाफराबादमध्ये या कायद्याच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात झाली. मौजपूर परिसरात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन करणारे आणि या कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्यांमध्ये दगडफेकीची घटना घडली. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून दिल्लीतील सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या हिंसक आंदोलनात एका पोलिस कर्मचाऱ्यासह १३ जणांचा मृत्यू झाला असून १३० अधिक लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:congress behind The delhi violence should be nee investigation on this case says ramdas athawale