पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने भाजपला विचारले ८ सवाल

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला

राज्याचे तीन दिवसाचे मुख्यमंत्री राहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी राजीनामा दिला. फडणवीस यांच्याआधी अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यातील सत्ता स्थापनेच्या नाट्यावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर टीका करत ८ सवाल केले आहेत. त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर निशाणा साधत ८ सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी केली आहे. 

दीड दिवसांचा गणपती ऐकून होतो, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोमणा

काँग्रेसने विचारलेले ८ प्रश्न - 

१. महाराष्ट्रात लोकशाहीचा तमाशा का केला?

२. राज्यपालांचा कळसुत्रीच्या बाहुल्यांप्रमाणे वापर का केला?

३. राष्ट्रपतींच्या सन्मानाला नुकसान का पोहचवले?

४. देशाच्या मंत्रिमंडळाला अपंग का केले?

५. पक्षबदल आणि घोडेबाजाराचा तांडव का केला?

6. अल्पमताचे सरकार असताना सुध्दा बहुमत असल्याचे नाटक का केले?

७. भ्रष्टाचाराचे खटले मागे का घेतले?

८. संविधानाला पायदळी का तुडवले?

उद्धव ठाकरे शिवतिर्थावर घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:congress asks these 8 questions from bjp after the resignation of devendra fadnavis as maharashtra cm