पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसमोर उभं राहण्याची पंतप्रधानांमध्ये हिंमत नाही'

राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी देशाची आर्थिक परिस्थिती आणि नागरिकत्व सुधारणा कायदा यासारख्या मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आज देशातील शेतकरी आणि विद्यार्थी केंद्र सरकारवर प्रचंड संतापले आहेत. त्यांच्या रागाचे मुख्य कारण आहे बेरोजगारी आणि महागाई. देशातील मोदी सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. दरम्यान, आज मोदी सरकारने तरुणांना रोजगार कसा मिळेल आणि अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत कशी करता येईल याचा विचार केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

'मोदी आणि आदित्यनाथ यांच्याविरोधात घोषणा देणाऱ्यांना जिवंत गाडू'

पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये हिंमत असेल तर ते आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसमोर उभे राहावे. तसंच त्यांनी मोदींना आव्हान देखील दिले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, पोलिसांना न घेता देशातील कोणत्याही विद्यापीठात जा आणि तेथील विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी तुम्ही नेमकं काय केले आहे ते सांगावे. आज देशातील अर्थव्यवस्थेची ही परिस्थिती का आहे? देशात इतकी बेरोजगारी का आहे? आणि विद्यापीठाच्या आत पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का करत आहेत? याची उत्तर मोदींनी विद्यार्थ्यांना द्यावी असे राहुल गांधींनी सांगितले. 

'पवारांना जाणता राजा, इंदिरा गांधींना दुर्गादेवी म्हणणं योग्य होतं का'

दिल्लीमध्ये सोमवारी नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसीसह देशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी थेट मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल यांनी केंद्र सरकारवर टीका करताना असे म्हटले आहे की, सरकार तरुणांचा आवाज दाबत आहे. रोजगाराविषयी बोलले जात नाही. तसंच, खराब अर्थव्यवस्थेवर केंद्र सरकारने उत्तर  दिले पाहिजे, असे म्हटले आहे. 

मोदींची तुलना शिवरायांसोबत करणाऱ्या लेखकाविरोधात गुन्हा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:congres leader rahul gandhi challenge to pm narendra modi go to any university stand there without police