पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीतील स्थितीवरून काँग्रेसचा अमित शहांवर निशाणा, राजीनाम्याची मागणी

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी आणि इतर नेते.

दिल्लीच्या एका भागात गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या हिंसाचाराला केंद्र आणि दिल्ली सरकार संयुक्तपणे जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. त्याचबरोबर दिल्लीतील कायदा सुव्यवस्था बिघडण्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशीही मागणी काँग्रेसने केली.

पुणे महापालिका बजेट सादर; सारसबागेचे नूतनीकरण, मध्यवस्तीत AC बसेस

काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बुधवारी नवी दिल्लीत झाली. या बैठकीमध्ये दिल्लीतील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. याच बैठकीमध्ये दिल्लीतील सद्यस्थितीला तेथील आपचे सरकारही जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. दिल्लीच्या ज्या भागात हिंसाचार सुरू आहे. तेथील लोकांपर्यंत जाऊन त्यांना शांतता राखण्यासाठी आवाहन करण्याचे काम दिल्ली सरकारचे होते. पण ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले नाही, असेही काँग्रेसने आरोपात म्हटले आहे.

दिल्लीत तातडीने लष्कर तैनात करा; केजरीवालांची गृहमंत्रालयाकडे मागणी

दिल्लीतील सद्यस्थिती हे दिल्ली आणि केंद्र सरकार यांचे संयुक्त अपयश आहे. दिवसेंदिवस दिल्लीतील परिस्थिती बिघडत जात असल्याचा आरोपही करण्यात आला. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था हा पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. त्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.