पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गांधी कुटुंबाच्या सुरक्षेवरून गोंधळात गोंधळ, SPG सुरक्षा काढण्याची चर्चा

गांधी कुटुंबाच्या सुरक्षेवरून गोंधळात गोंधळ

गांधी कुटुंबातील सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना देण्यात आलेल्या एसपीजी सुरक्षाकवचाच्या नियमांमध्ये करण्यात आलेले बदल म्हणजे या कुटुंबातील नेत्यांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्यासारखे असून, त्यामुळे गांधी कुटुंबातील नेत्यांचे खासगी आयुष्य धोक्यात येऊन त्यांच्यावर सरकार सातत्याने निगराणी ठेवू शकणार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

२८८ जागा आणि ३२३९ उमेदवार, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार

देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना देण्यात आलेल्या एसपीजी सुरक्षेचा दरवर्षी आढावा घेतला जातो. नुकताच याचा आढावा घेण्यात आला. त्या संदर्भातील एक वृत्त 'संडे गार्डियन' वृत्तपत्रात छापून आले आहे. त्या वृत्तातील माहितीनुसार, गांधी कुटुंबातील नेत्यांना यापुढे परदेश दौऱ्यावर जाताना सोबत एसपीजी सुरक्षेतील जवान घेऊन जाणे बंधनकारक करण्यात येणार आहे. जर त्याला विरोध करण्यात आला तर या कुटुंबातील नेत्यांना सुरक्षेच्या कारणास्तव परदेश दौऱ्यावर जाण्यास परवानगी नाकारली जाऊ शकते, असे या वृत्तात म्हटले आहे. सरकारने सोमवारी या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पण एकूणच या संदर्भात परस्परविरोधी माहिती पुढे येत आहे.

 

'धाडसी आणि कठोर निर्णय घेण्याची सरकारमध्ये ताकद'

जर एसपीजी सुरक्षेतील सुधारित नियमांचा अवलंब करण्यास नकार दिला तर गांधी कुटुंबाचे एसपीजी कवचच काढून घेतले जाईल, असे त्यांना सांगण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पण याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

केंद्रीय गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गांधी कुटुंबाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला असून, त्यांना एसपीजी सुरक्षेऐवजी नॅशनल सिक्युरिटी गार्ड किंवा केंद्रीय राखीव पोलिस दल यांची सुरक्षा पुरविली जावी, असे सूचविण्यात आले आहे. एसपीजी सुरक्षेचा दरवर्षी आढावा घेतला जातो. यावर्षी घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार गांधी कुटुंबातील सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना जीविताला असलेला धोका कमी झाला आहे. त्यामुळे त्यांना एसपीजीऐवजी इतर सुरक्षा पुरविली जावी, असे सूचविण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईतल्या ३६ जागांसाठी ३३३ उमेदवार रिंगणात

या संदर्भात गांधी कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नसल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते प्रणव झा यांनी सांगितले.