पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नरेंद्र मोदी अमेरिकेला रवाना, भारताच्या जागतिक नेतृत्त्वासाठी उपयुक्त दौरा

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री आठवडाभराच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले. निघण्यापूर्वी केलेल्या निवेदनात पंतप्रधानांनी भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासाठी आणि जागतिक पातळीवर भारत नेतृत्त्व करू शकतो हे दाखवून देण्यासाठी हा दौरा निश्चित उपयुक्त ठरेल, असे म्हटले आहे.

पक्षांतर करून आलेल्या बहुतांश नेत्यांना भाजपकडून उमेदवारी पक्की

अमेरिका दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक सर्वसाधारणसभेत सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना संबोधित करणार आहेत. त्याचबरोबर ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी ते संवाद साधतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही ते चर्चा करणार असून, यावेळी द्विपक्षीय संबंध आणखी पुढे कसे घेऊन जाता येतील, यावर दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय होईल.

आपल्या निवदेनात नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, भारत हा विविध प्रकारच्या संधीसाठी उपयुक्त देश आहे हे माझ्या दौऱ्यातून अजून नेमकेपणाने अधोरेखित होईल. त्याचबरोबर या माध्यमातून अमेरिकेशी असलेल्या संबंधांना नवी ऊर्जा मिळेल. दोन्ही देशातील नागरिकांना आणि देशांना मैत्रीचा कसा फायदा होईल, यावरही या बैठकीत विचार होईल. भारताच्या विकासामध्ये अमेरिका हा महत्त्वाचा भागीदार देश आहे. दोन्ही देशांमध्ये शिक्षण, कौशल्यविकास, संशोधन, तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये भागीदाराची मोठी संधी आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

स्वामी चिन्मयानंद यांना आरोप मान्य, स्वतःचीच लाज वाटत असल्याचे वक्तव्य

मोदींच्या अमेरिका दौऱ्यानिमित्त ह्युस्टनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा सहभागी होणार आहेत.