पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणूमुळे सिंगापूरमध्ये कंडोम खरेदीसाठी गर्दी

कोरोना विषाणूमुळे सिंगापूरमध्ये कंडोम खरेदीसाठी गर्दी

चीननंतर सिंगापूरही कोरोना विषाणूच्या परिघात आले आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत तिथे एकूण ४७ कोरोना विषाणू संबंधीचे प्रकरणे समोर आली आहेत. स्थानिक सरकारने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सिंगापूरचे पंतप्रधान ह्सियन लुंग यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर गरजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी दुकाने, मॉलमध्ये मोठी गर्दी उसळली आहे. लोक तांदूळ, टॉयलेट पेपर, टिश्यू बॉक्स आणि मास्कची घाऊक खरेदी करत आहेत. 

लासलगावला महिलेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

याचदरम्यान लोकांमध्ये वेगळीच अफवा पसरली आहे. कोरोनापासून बचावासाठी कंडोम प्रभावी ठरत असल्याची अफवा सिंगापूरमध्ये पसरली आहे. त्यामुळे लोकांनी मोठ्याप्रमाणात कंडोम खरेदी सुरु केली आहे. मेडिकलमधील कंडोम संपले आहेत. सोशल मीडियीवर लोक कंडोम कोरोना विषाणूला दूर ठेवण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत आहेत. लिफ्टचे बटन दाबण्यापासून ते कारचा दरवाजा उघडण्यासाठी लोक हातात कंडोम घातलेले दिसत आहेत. 

...तर कीर्तन सोडून शेती करेन, इंदुरीकर महाराज व्यथित

दरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता यामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या १६३१ वर पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांत या आजारामुळे १४३ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी चीनच्या आरोग्य अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Condoms unexpectedly sold out at pharmacies and grocery stores in Singapore amidst coronavirus fear