पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७० हटवल्यानंतर भारतात दहशतवादी हल्ला होण्याची अमेरिकेला भीती

दहशतवादी (प्रतिकात्मक छायाचित्र)

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती आहे. याचदरम्यान एक मोठे वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटना भारतात हल्ला करणार असल्याचे सांगत अमेरिकेने सावध केले आहे. पाकिस्तानने जर या दहशतवादी संघटनांना नियंत्रणात ठेवले तर हे हल्ले रोखले जाऊ शकतात, असेही अमेरिकेने म्हटले आहे. 

एअर इंडियाकडून महात्मा गांधींना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली

सहायक संरक्षण मंत्री रँडल शायवर यांनी वॉशिंग्टनमधील म्हटले की, काश्मीरवरील निर्णयानंतर अनेकांना सीमेपलीकडून हल्ला होण्याची भीती वाटत आहे. चीनला अशा तऱ्हेचा संघर्ष हवा असेल किंवा त्यांचा त्याला पाठिंबा असेल असे मला वाटत नाही. चीनकडून पाकिस्तानला दिला जात असलेल्या पाठिंब्याविषयी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना शायवर यांनी ही माहिती दिली.

कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमधून १४४ मुलांना अटक, अहवालात खुलासा

मला वाटते चीनचा पाकला पाठिंबा हा कुटनीतीक आणि राजकीय आहे. चीनने आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानला समर्थन दिले आहे. संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्दा घेऊन जायचा किंवा नाही, यावर काही चर्चा झाली तर चीन त्यांना पाठिंबा देईल. पण मला वाटत नाही की चीन यापेक्षा जास्त काही करेल, असे ते म्हणाले.

इस्रोतील शास्त्रज्ञांची हैदरबादमध्ये हत्या