पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात परतणाऱ्या चिनी नागरिकांसाठी कोरोनामुळे नवा नियम अन्यथा शिक्षा

परतणाऱ्या नागरिकांसाठी बीजिंगमध्ये नवा नियम

कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे चीनमध्ये आतापर्यंत १५२३ बळी गेले आहेत, तर ६६४९२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे चीनमधील नववर्षांच्या सुट्ट्यांमध्ये वाढ करण्यात आली होती. अनेक नागरीक सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी परदेशी होते, मात्र आता ते मायदेशी परतू पाहत आहेत, अशातच शुक्रवारी रात्री अचानक चीनमध्ये परतणाऱ्या नागरिकांसाठी बीजिंगमध्ये नवा नियम करण्यात आला आहे. 

चीनमध्ये कोरोनामुळे १५२३ मृत्युमुखी, ५,१३,१८३ बाधितांच्या संपर्कात

 बीजिंगमध्ये परतणाऱ्या नागरिकांना १४ दिवस सर्वांपासून वेगळे ठेवण्यात येणार आहेत. परत आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झालेली नाही किंवा त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं आढळत नाहीत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत चौदा दिवस वेगळं राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. जर कोणी हा नियम धुडकावला तर त्यास शिक्षा देण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री या नियमाची अंमलबजावणी करण्यात आली. 

विवाहबाह्य संबंधांतून पाच मुलांच्या आईने केली नवऱ्याची हत्या

बीजिंग शहरात येणाऱ्या नागरिकाला त्यानं शहराबाहेर किंवा चीनबाहेर असताना कुठे कुठे प्रवास केला याची माहिती शहरात येण्यापूर्वी इथल्या अधिकाऱ्यांना देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तशी सूचनाच नागरिकांना करण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभरात चीनमध्ये २६४१ जणांना कोरोनाची लागण झालेली असल्याचे स्पष्ट झाले. तर दुसरीकडे या आजारातून बरे झाल्यामुळे १३७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारी एका दिवसात कोरोनामुळे १३९ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फैलाव चीनमधील हुबेई प्रांत आणि त्याची राजधानी वुहानमध्ये सर्वाधिक  प्रमाणात झाला आहे. 

बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी दोन नव्या इमारती