पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतात अद्याप कोरोनाचा समूह संसर्ग नाही, ICMR ची माहिती

कोरोना

देशातील कोरोना विषाणूबाधितांची संख्या वाढत असतानाच त्यातल्या त्यात एक समाधानाची माहिती पुढे आली आहे. भारतात अजून कोरोना विषाणूचा समूह संसर्ग सुरू झाला नसल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

PM मोदींच्या भाषणासंदर्भात चिदंबरम यांची 'मन की बात'

ते म्हणाले, कोरोना विषाणूचा समूह संसर्ग सुरू झाला आहे का, हे पाहण्यासाठी आम्ही एकूण ५० शहरांमध्ये ८२० नागरिकांचे नमुने घेतले आहेत. पण ते सर्वच्या सर्व निगेटिव्ह आले आहेत. आता आम्ही नमुन्यांची आणि शहरांची संख्याही वाढविणार आहोत. ज्या भागात कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळले आहेत. तिथे आम्ही आणखी नमुने घेणार आहोत. पण तूर्त तरी देशात कोरोना विषाणूचा समूह संसर्ग सुरू झालेला नसल्याचे आमच्या अभ्यासातून दिसते आहे.

सध्या देशात जे कोरोना विषाणूबाधित रुग्ण आहेत. ते परदेशातून आलेले आहेत. त्याचबरोबर या रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. पण परदेशात न गेलेल्या किंवा परदेशात गेलेल्यांच्या संपर्कात न आलेल्या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे अजून दिसलेले नाही. याच प्रक्रियेला समूह संसर्ग (कम्युनिटी ट्रान्समिशन) म्हणतात. समूह संसर्ग सुरू न होणे भारतातील लोकांसाठी समाधानकारक वृत्त आहे.

देशात कोरोनाचा चौथा बळी; पंजाबमध्ये उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या देशात १६७ वर जाऊन पोहोचली आहे. या विषाणूचा संसर्ग झालेल्या चौघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.