पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मूसह पाच जिल्ह्यांतील २जी मोबाईल इंटरनेट सेवा सुरू

जम्मू-काश्मीरमध्ये तैनात सुरक्षा जवान

जम्मूसह एकूण पाच जिल्ह्यांतील २ जी मोबाईल इंटरनेट सेवा सरकारने शनिवारपासून सुरू केली. यामध्ये जम्मू, रिआसी, सांबा, कथुआ आणि उधमपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तथापि, काश्मीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा अद्याप खंडीत ठेवण्यात आली आहे.

काश्मिरच्या मुद्द्यावरून पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर आपटला

जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गेल्या ५ ऑगस्टपासून जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद केली होती. सरकारने जम्मू-काश्मीरचे विभाजन करून लडाख या नव्या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मिरही केंद्रशासित प्रदेश करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमधील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा टप्याटप्याने सुरू करण्यात येईल, असे जम्मू-काश्मिरचे मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी शुक्रवार पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी त्यांच्याकडून मोबाईल इंटरनेट सेवेचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळेच सरकारने ही सेवा बंद ठेवली होती. आठवड्याच्या अखेरपर्यंत टप्याटप्याने बहुतांश सेवा सुरळीत केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

पुण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केली कमाल!, ७७ आरोपी अटकेत

जम्मू-काश्मीरमध्ये सरकारकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये कोणताही हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. राज्यात सामान्य जनजीवन सुरळीत करण्यासाठी सरकारला आणखी वेळ दिला पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Communication blackout in Jammu region ends 2G mobile internet services restored in 5 districts