पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खास भेट घेऊन जा, व्हॅलेंटाइन डे निमित्तानं शाहिन बागेतील आंदोलकांचं मोदींना आमंत्रण

संग्रहित छायाचित्र

सुधारिकत नागरिकत्त्व कायदा आणि नागरिकत्त्व नोंदणीविरोधात गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ आंदोलन करणाऱ्या  शाहिन बागेतील आंदोलकांनी, मोदींना व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेमाचा दिवस साजरा करण्याचं आमंत्रण दिलं आहे. मोदींनी कृपा करून शाहिन बागेत यावं, त्यांच्यासाठी एक अनपेक्षित भेटवस्तू आहे ती देखील त्यांनी स्वीकारावी, असं इथल्या आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर श्रीनगर-जम्मू महामार्गावरून जवानांच्या प्रवासात घट

या आंदोलनकर्त्यांनी प्रेमाचे गीत लिहिलं आहे तसेच मोदींसाठी भेटही तयार केली आहे.  'आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांपैकी कोणीही यावं. ते आमच्याशी संवाद साधू शकतात. जे काही सुरु आहे ते  संविधानाच्या विरोधात नाही  हे त्यांनी आम्हाला पटवून द्यावं आम्ही हे आंदोलन थांबवायला तयार आहोत', असं शाहिन बागेतील आंदोलनकर्ते सईद अहमद पीटीआयशी साधलेल्या संवादात म्हणाले. 

कोरोना : पुण्यातील नायडू रुग्णालयातील सेवेने चिनी प्रवासी भारावला

सुधारिकत नागरिकत्त्व कायद्यामुळे देशाला कसा फायदा होईल हे तरी समजून सांगावं. या कायद्यामुळे बेरोजगारी, गरिबी, आर्थिक मंदी या महत्त्वाच्या मुद्द्यावर कसा तोडगा निघणार आहे हे सांगा? असाही सवाल आंदोलनकर्त्यांनी केला आहे. सोमवारी शाहिन बाग परिसरात गेल्या ५० हून अधिक दिवसांपासून रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांना तातडीने हटविण्याचे आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्याचवेळी कोणतेही आंदोलक सार्वजनिक वाहतुकीचा रस्ता बेमुदत काळासाठी अडवून आंदोलन करू शकत नाहीत, असेही न्यायालयाने सूचकपणे स्पष्ट केले.

पुलवामा : शहिदांच्या कुटुंबीयांची उपेक्षा, आश्वासनांची पूर्तता नाहीच