पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरेंनी घेतली मोदींची भेट, आदित्यही दिसले सोबत

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी घेतली मोदींची भेट

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये पोहचले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी जाऊन मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मंत्री आणि त्यांचे पूत्र आदित्य ठाकरेही उपस्थितीत होते. उद्धव ठाकरे यांनी तब्बल तासभर पंतप्रधानांशी चर्चा केली आहे. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. उद्धव ठाकरे हे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार असून यावेळी ते काय माहिती देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.    

'पाक जिंदाबाद म्हणणाऱ्या तरुणीचे नक्षलवाद्यांशी कनेक्शन'

याशिवाय उद्धव ठाकरे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची देखील भेट घेणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्रित निवडणूक लढले. मात्र मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षातील वाद विकोपाला गेल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने सत्तास्थापन केली. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिला दिल्ली दौरा आहे.   

वारिस पठाणांविरोधात पक्षाची कारवाई, माध्यमांशी बोलण्यास घातली बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची चर्चा जोर धरत असतानाच या भेटीपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून केंद्रसरकारवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. राममंदीराच्या मुद्यावरुन शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला. राम मदींराचा मुद्दा हा सर्वोच्च न्यायालयामुळे निकाली लागला. मंदीराचे काम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे.

राज्यपालांचा ठाकरे सरकारला दणका; सरपंच निवडीचा अध्यादेश फेटाळला

२०२४ च्या आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप राम मंदिराचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करेल, अशा शब्दांत सामनातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. जर राम मंदिराचे काम २०२४ पर्यंत पूर्ण झाले तर भाजप लोकसभेत या मुद्याचा फायदा उठवेल. त्यावेळी पाकिस्तान किंवा सर्जिकल स्ट्राईक यासारखे मुद्दे चालणार नाहीत, असा उल्लेख 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आला आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:cm uddhav thackeray pm narendra modi meeting maharashtra-cm will also meet congress chief sonia gandhi and bjp leader lalkrishna advani