पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बुलबुल चक्रीवादळाने घेतला ९ जणांचा बळी; ममता बॅनर्जींची हवाई पहाणी

ममता बॅनर्जी

'बुलबुल' चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालचे मोठे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाने आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये ९ जणांचा, ओडीशामध्ये २ जणांचा बळी घेतला आहे. तर बांगलादेशमध्ये या चक्रीवादळामुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या चक्रीवादळामुळे आतापर्यंत १ लाख घरांचे नुकसान झाले असून २ लाख ७३ हजार नागरिक बेघर झाले आहेत. तर या वादळामुळे पश्चिम बंगालमधील नागरिकांचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे.

शेतकऱ्यांच्या अजेंड्यावर शिवसेना- राष्ट्रवादी एकत्र काम करणार

बुलबुल चक्रीवादळामुळे वेगवान वारे वाहत आहे. त्यामुळे अनेक झाडे जमीनदोस्त झाली आहेत. राज्यात २० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकसानग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. त्यांनी कोलकाताच्या नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि मुख्य सचिव राजीव सिन्हा यांच्यासोबत चर्चा केली. या चक्रीवादळामुळे बेघर झालेल्या १ लाख ७८ नागरिकांची सरकारी आणि सामाजिक संस्थांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

लता मंगेशकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृतीत सुधारणा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरुन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची सर्व माहिती घेतली. तसंच पश्चिम बंगाल राज्याला केंद्राकडून योग्य ती मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसंच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरुन चर्चा करत राज्यातील स्थितीची विचारणा केली. केंद्राकडून पूर्ण मदतीचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

अशा वातावरणात दिल्लीत राहू शकत नाहीः अरविंद सावंत