पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अरुणाचल प्रदेशमध्ये ढगफूटी; जनजिवन विस्कळीत

अरुणाचल प्रदेशमध्ये ढगफूटी

अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या दोन्ही राज्यातील जनजिवन पूर्णता विस्कळीत झाले आहे. आसाममधील 8 जिल्ह्यांतील 62 हजार लोकं पूरामुळे प्रभावित झाले आहेत. तर अरुणाचल प्रदेशमध्ये सोमवारी ढग फूटी झाल्यामुळे आलेल्या पूरात पुल आणि घरं वाहून गेले आहेत तर अनेक घरांची पडझड झाली आहे. या ढगफूटीमुळे अरुणाचल प्रदेशमधील अनेक लोकं बेपत्ता झाली आहेत.

मालाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा 29 वर

आसामचे आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले की, पूराचे पाणी 145 गावांमध्ये शिरले आहे. तर 3,435 हेक्टर जमिनीवरील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आसाममध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. धेमाजी, लखीमपुर, विश्वनाथ, बारपेटा, चिरांग गोलाघाट, जोरहाट आणि डिब्रुगड या गावातील 62 हजार 400 लोकं पूरामुळे प्रभावित झाले आहेत. सध्या बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. बारपेटा, उदालगुरी, लखीमपुरी, सोनितपुर आणि जोरहाट जिल्ह्यातील रस्ते आणि पुलासह घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

राष्ट्रवादीला झटका; आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेत

अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम कामेंग जिल्ह्यामध्ये सोमवारी ढगफूटीमुळे पूर आला. यामध्ये अनेक लोकं बेपत्ता झाली तर काही जण पूरामध्ये अडकली आहेत. तर पूराच्या पाण्यामध्ये अनेकांच्या कार आणि मोटार सायकल वाहून गेल्या. एनडीआरएफ टीमसोबत लष्कराच्या जवानांकडून बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. हवामान खात्याने आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिजोरम आणि त्रिपुरामध्ये 9 जुलै ते 12 जुलै दरम्यान मुसळधार पावासाची शक्यता वर्तवली आहे.