पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बंगळुरू विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, विमानाने धावपट्टी सोडली आणि...

गोएअर विमान कंपनी

बंगळुरू विमानतळावर सोमवारी सकाळी एक मोठी दुर्घटना टळली. गोएअर विमान कंपनीचे एक विमान विमानतळावर उतरताना धावपट्टीच्या बाहेर गेले. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. यावेळी विमानामध्ये कर्मचाऱ्यांसह १८० प्रवासी होते. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने हा विषय खूप गंभीरपणे घेतला असून, या विमानाच्या दोन्ही वैमानिकांना शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले आहे. 

मूडीजकडून पुन्हा धक्का, विकासदर आणखी घटण्याचा अंदाज

मिळालेल्या माहितीनुसार, गोएअरचे ए३२० बनावटीचे विमान नागपूरहून आले होते. हे विमान सोमवारी सकाळी सव्वासात वाजता बंगळुरू विमानतळावर उतरले. पण विमान उतरताना ते धावपट्टी सोडून बाजूला गेले. पण विमानातील कोणीही या घटनेमुळे जखमी झाले नाही. हा विषय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने खूप गांभीर्याने घेतला आहे. त्यामुळे दोन्ही वैमानिकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

'लोकसभा निवडणुकीतही हारले आणि आता सुप्रीम कोर्टातही'

याच वर्षी ऑगस्ट महिन्यात महासंचालनालयाने देशातील १२ वैमानिकांना निलंबित केले होते. सहा वेगवेगळ्या घटनांमध्ये हे सर्व वैमानिक नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी दोषी आढळले होते.