दिल्ली हिंसाचाराबद्दल दाखल याचिकेची तातडीने सुनावणी घेणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस मुरलीधर यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात तातडीने बदली केली गेल्यावर काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली. भाजप सरकारने केलेल्या हिंट एँड रन अन्यायाचे हे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे. गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
दिल्ली हिंसाचार : पश्चिमी उत्तर प्रदेशातून आणल्या गेल्या गावठी पिस्तूल
रणदीप सुर्जेवाला म्हणाले, देशात जो कोणी न्याय देण्याचा प्रयत्न करेल त्याला भाजप सरकार सोडणार नाही, असेच चित्र सध्या निर्माण झाले आहे. भाजपच्या नेत्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांविरोधात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी न्या. मुरलीधर यांच्या न्यायालयात सुरू होती. पण त्याची तातडीने बदली करण्यात आली. बदला घेण्याचे राजकारण आणि भाजपच्या दबावतंत्राचेच हे उदाहरण असल्याचा आरोप त्यांनी केला.
या संदर्भात मंगळवारी रात्री उशिरा एक निवेदन जारी करण्यात आले. त्यानुसार न्या. एस मुरलीधर यांना पंजाब एँड हरियाणा उच्च न्यायालयात तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्या. मुरलीधर यांची पंजाब एँड हरियाणा उच्च न्यायालयात बदली करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने (कॉलेजियम) १२ फेब्रुवारीलाच केली होती. सरन्यायाधीश शरद बोबडे हेच या न्यायवृंदाचे प्रमुख आहेत. त्यावर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबईत दोन वेगवेगळ्या घटनांत तरुणीवर तिघांचा बलात्कार
दिल्ली उच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलने याआधीच या बदलीला विरोध केला आहे. बार कौन्सिलच्या वकिलांनी यासाठी एक दिवस काम बंद आंदोलनही केले होते.