पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तिसरीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या

लहान मुलीवर बलात्कार

तामिळनाडूमध्ये शिवकाशीजवळील एका गावात आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आसाममधील एका व्यक्तीला अटक केली. ही मुलगी गेल्या सोमवारी तिच्या घराजवळून बेपत्ता झाली होती. तेव्हापासून तिचा शोध घेतला जात होता. तिचा मृतदेह तिच्या घराजवळ अर्धा किलोमीटरवर असलेल्या भागात सापडला होता.

शनिचा मकर राशीत प्रवेश, तुमच्या राशीला काय फळ मिळणार?

पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी तपास करताना पोलिसांनी इतर राज्यांतून कामानिमित्त तामिळनाडूमध्ये आलेल्या सहा जणांना ताब्यात घेतले. यामध्ये माजिद अली (वय २०) याचाही समावेश होता. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने हा गुन्हा आपणच केला असल्याची कबुली दिली. संबंधित मुलगी मदत मागण्यासाठी माजिदकडे आली होती. यावेळी त्याने तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केला. 

दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानाची सुरक्षा काढल्याची माहिती

पोलिसांना सुरुवातीला हा सामूहिक बलात्काराचा प्रकार असल्याचे वाटले. पण तपास केल्यावर हे एकाच व्यक्तीने केलेले कृत्य असल्याचे उघड झाले. इयत्ता तिसरीत शिकणारी ही मुलगी शाळा सुटल्यावर आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी जात होती. सोमवारी ती बेपत्ता झाल्यावर या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.