पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: राजस्थानमध्ये संघाचे स्वयंसेवक आणि मुस्लिम तरुणांमध्ये हाणामारी

आरएसएस आणि मुस्लिम तरुणांमध्ये हाणामारी

राजस्थानच्या बंदूी जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखे दरम्यान गुरुवारी मारहाणीची घटना घडली आहे. एएआयने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी बालचंद्र पाडा नवल सागर पार्क येथे आरएसएसची शाखा सुरु होती त्याचवेळी मुस्लीम समुदायातील लोकं आणि आरएसएसच्या स्वयंसेवकांमध्ये मारामारी झाली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बूंदी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होत पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बूंदी शहराच्या नवल सागर पार्कमध्ये संघाची शाखा सुरु होती. यावेळी काही मुस्लिम समुदायाच्या महिला आणि पुरुषांचा स्वयंसेवकांशी वाद झाला. त्यानंतर दोन्ही गटामध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी आरएसएसकडून सुबोध कुमार यांनी तक्रार दाखल केली. त्यांनी असे सांगितले की, मुस्लिम समुदायाने मारहाणीनंतर पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी केली.  

 

अहमदाबादः मानहानी खटल्याप्रकरणी राहुल गांधींना जामीन

पोलिसांनी सांगितले की, हे मुस्लिम समुदयातील लोकं अहमदाबाद येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी आले होते. ते फिरण्यासाठी पार्कमध्ये आले होते. त्याचवेळी त्यांची आरएसएसच्या स्वयंसेवकांसोबत वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर दोन्ही गटामध्ये मारहाणीची घटना घडली. मुस्लिम समुदयातील या लोकांनी आरएसएसच्या स्वयंसेवकांवर एकाचे डोकं फोडल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे सध्या तणावाचे वातावरण आहे.

नागपूरमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून ३ मजुरांचा दुर्देवी मृत्यू