पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

JNU हिंसाचार: कोलकात्यात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचे वृत्त

दिल्लीतील जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठातील  आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचे वृत्त आहे. कोलकाता येथील सुलेखा मोर परिसरात आंदोलनादरम्यान पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचे वृत्त आहे. 

JNU हिंसाचार : NCP चे युवा आमदार रोहित पवारांनी विचारले संतप्त सवाल

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील हिंसाचाराच्या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. अनेक विद्यार्थी संघटना फलकबाजी आणि घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन करत जेएनयूतील घटनेचा निषेध व्यक्त केला. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहे.

जेएनयू हिंसाचार: कुलुगुरुंना हटवण्याची मागणी

राज्यातील मुंबई येथील 'गेट वे ऑफ इंडिया' तसेच पुणे आणि नाशिकमध्ये निषेध मोर्चे काढण्यात आले. बॉलिवूडमधील कलाकारांनीही या हल्ल्याच्या घटनेचा निषेध केला. सर्व स्तरांतून या हल्ल्याचा निषेध व्यक्त होत असतानाच, पश्चिम बंगालमधील विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देखील सोमवारी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी कोलकाताच्या सुलेखा मोडजवळ पोलीस आणि आंदोलक विद्यार्थी आपापसांत भिडले. त्यावेळी पोलिसांना विद्यार्थ्यांवर लाठीमार करावा लागला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Clash between Jadavpur University students and police personnel near Sulekha Mor in Kolkata during protest against JNU violence