पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरन्यायाधीश आरटीआयच्या कक्षेत आहेत की नाहीत?, आज निकाल

सर्वोच्च न्यायालय

सरन्यायाधीश माहिती अधिकार कक्षेत (आरटीआय) येतात की नाहीत, यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींचा समावेश असलेले घटनापीठ बुधवारी निकाल देईल. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई अध्यक्ष असलेल्या या घटनापीठाचा निकाल दुपारी २ वाजता अपेक्षित आहे.

या प्रकरणाचा निकाल दिला जाणार असल्याची नोटीस मंगळवारी दुपारी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने उच्च न्यायालय आणि केंद्रीय माहिती आयोगाच्या (सीआयसी) आदेशाविरोधात २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरचिटणीस आणि केंद्रीय माहिती अधिकाऱ्याकडून दाखल अपिलांवर गत ४ एप्रिल रोजी निर्णय सुरक्षित ठेवण्यात आला होता. 

मोदी-शहांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट: दिग्विजय सिंह

सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील पीठाने सुनावणी पूर्ण करताना म्हटले होते की, कोणतीही अपारदर्शक व्यवस्था नसावी. पण पारदर्शकतेच्या नावावर न्यायपालिका भ्रष्ट केली जाऊ शकत नाही. कोणीही काळोखात राहू इच्छित नाही, किंवा कोणालाही काळोखात ठेवू इच्छित नाही. तुम्ही पारदर्शकतेच्या नावाखाली संस्थेला नष्ट करु शकत नाही. 

दिल्ली उच्च न्यायालयाने १० जानेवारी २०१० मध्ये एक ऐतिहासिक निकाल देताना सरन्यायाधीश कार्यालय आरटीआय कायद्याअंतर्गत येत असल्याचा निकाला दिला होता. न्यायिक स्वातंत्रता न्यायाधिशाचा विशेषाधिकार नाही, तर ती त्याची एक जबाबदारी असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले होते.

मित्र पक्षाच्या अट्टाहासामुळेच राष्ट्रपती राजवट : मुनगंटीवार