पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'गरज पडल्यास मी स्वत: जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात जाईन'

सरन्यायाधीश रंजन गोगोई

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले की, 'गरज पडल्यास मी स्वतः जम्मू-काश्मीरला जाईन.' नागरिकांना जम्मू-काश्मीर हायकोर्टाशी संपर्क साधण्यात अडचणी येत असल्याच्या आरोपावरून सुप्रीम कोर्टाने  हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून अहवाल मागविला आहे. तसंच, 'गरज पडल्यास मी स्वत: जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात जाईन.', असे रंजन गोगोई यांनी सांगितले. 

फारुख अब्दुल्ला सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत स्थानबद्ध

रंजन गोगोई यांनी पुढे असे सांगितले की, 'नागरिकांचा हाय कोर्टात जाण्यावर परिणाम झाला आहे. याप्रकरणी मी जम्मू-काश्मीर हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांकडून उत्तर मागितले आहे. जर गरज पडली तर मी स्वत: हायकोर्टात जाऊन मुख्य नायाधीशांशी बोलणार आहे. जर नागरिक हायकोर्टात जात नाहीत तर त्यावर आपल्याला काहीतरी करावे लागेल', असे गोगोई यांनी सांगितले. 

एक्स्प्रेस वेवर अपघातात पुण्यातील डॉक्टरांसह दोघांचा मृत्यू

सुनावणी दरम्यान सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले की, 'जम्मू-काश्मीरमध्ये सर्व कोर्ट काम करत आहेत.' सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला काश्मीरच्या खोऱ्यात लवकरात लवकर सामान्य स्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एस. अब्दुल. नजीर यांचे खंडपीठ जम्मू-काश्मीरसंदर्भातील याचिकांवर सुनावणी करत आहेत.  

'देवच या देशाचं रक्षण करो'; वाढदिवसानिमित्त चिदंबरम यांचे टि्वट