पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

न्या. रंजन गोगोई यांच्याकडून सरन्यायाधीशपदासाठी न्या. शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस

सर्वोच्च न्यायालय

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्या. शरद बोबडे यांची नियुक्ती केली जावी, अशी शिफारस केंद्र सरकारच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाकडे केली आहे. न्या. रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबर रोजी या पदावरून निवृत्त होत आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथेप्रमाणे त्यांनी पुढील सरन्यायाधीश कोण असावे, याची शिफारस सरकारकडे केली आहे. सरकारला पत्र लिहून त्यांनी ही शिफारस केली आहे. सर्वसाधारणपणे सेवाज्येष्ठता आणि अनुभव या आधारावर सरन्यायाधीशांकडून पुढील नावाची शिफारस केली जाते, असे संकेत असतात.

सीजे हाऊस व्यवहार प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून चौकशी

माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी निवृत्तीवेळी कायदा आणि न्याय मंत्रालयाला पत्र लिहून न्या. रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस केली होती. आता न्या. रंजन गोगोई यांनी न्या. शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस केली आहे. 

आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन जाधवांविरोधात गुन्हा दाखल

न्या. शरद बोबडे हे मध्य प्रदेशमधील उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश होते. गेल्या काही वर्षांपासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. ते २३ एप्रिल २०२१ मध्ये न्यायाधीशपदावरून निवृत्त होणार आहेत.