दहशतवाद्यांनी रविवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात एका नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. दहशतवाद्यांनी व्यवसायाने ठेकेदार असलेल्या गुलामनबी मीरवर (५५) त्याच्या घराबाहेर सायंकाळी ७.३० वाजता गोळया झाडल्या. मीरला जवळच्याच एका रुग्णालयात नेण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
बांगलादेश U-19 वर्ल्डकपचा चॅम्पियन, भारताचा धक्कादायक पराभव
Jammu & Kashmir: A civilian shot dead by suspected terrorists in Tral, Pulwama. More details awaited. pic.twitter.com/naFBoL3kPZ
— ANI (@ANI) February 9, 2020
कोणत्याही दहशतवादी संघटनेने आतापर्यंत या हत्येची जबाबदारी घेतलेली नाही. यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांनी दोन वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांच्या पाच सक्रिय दहशतवाद्यांना अटक केली होती. अधिकाऱ्यांनी शनिवारी याची माहिती दिली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बडगाम जिल्ह्यात चदूरा परिसरात सक्रिय हिजबूल मुजाहिदीनच्या टोळीचा भंडाफोड केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तिकडे बॅ.जीना सुखी, इकडे महात्मा गांधी बदनामः संजय राऊत
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कारवाईदरम्यान जिल्ह्यातून आमिर शफी दार, शब्बीर अहमद गनी आणि मुद्दसिर अहमद खान यांना अटक केले आहे. हे सर्व गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात सक्रिय झाले होते आणि अनेक विध्वंसकारी घटनांमध्ये त्यांचा सहभाग होता. दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि त्यांना साहित्य जमा करण्यासाठी मदत करण्याचे ते काम करत होते.