पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

COVID-19: इराणवरुन आलेल्या भारतीयांपैकी ७ जण कोरोना पॉझिटिव्ह

इराणवरुन आलेले भारतीय

कोरोना विषाणूने जगभरात कहर केला आहे. याच दरम्यान परदेशात अडकलेल्या आपल्या नागरिकांना भारतात आणण्याचे प्रयत्न भारताकडून सुरु आहेत. रविवारी इराणवरुन भारतात आलेल्या २७५ भारतीयांपैकी ७ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वांची तपासणी करुन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मंगळवारी सर्वांचा कोरोना तपासणी अहवाल आला. यामध्ये ७ जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोनामुळे संपूर्ण जगात मंदीची शक्यता, भारतासाठी मात्र खूशखबर

राजस्थानचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) रोहित कुमार सिंह यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 'राजस्थानमध्ये मंगळवारी आणखी ४ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ८३ वर पोहचला आहे. या ८३ कोरोनाबाधितांमध्ये इराणवरुन आलेल्या ७ भारतीयांचा समावेश आहे. ज्यांना रविवारी जोधपूर येथे आणण्यात आले होते.' महत्वाचे म्हणजे, राजस्थानमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत मृत्यूची नोंद झाली नाही. 

'वृत्तपत्र, दुधाच्या पिशवीला हात लावल्याने कोरोना होत नाही'

इराणवरुन २७५ भारतीय नागरिक रविवारी जोधपूर विमानतळावर दाखल झाले होते. याच ठिकाणी त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जोधपूरच्या मिलिटरी स्टेशनवर आणण्यात आले. याठिकाणी त्यांना विलनीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या २७५ नागरिकांमध्ये सहा लहान मुलांसह १३३ महिला आणि १४२ पुरुष सहभागी होते. मंगळवारी आलेल्या तपासणी अहवालात यामधील ७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी इराणवरुन २३४ नागरिकांना भारतात आणण्यात आले होते.

'कोरोनातून बरे झालेल्यांच्या प्लाज्मा इतरांना बरं करण्यासाठी उपयुक्त' 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:civid 19 india 7 people who were evacuated from iran have tested positive for coronavirus