पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Citizenship Bill : त्रिपुरा-आसाममध्ये ५००० जवान तैनात

आसाम-त्रिपुरात नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आंदोलन

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आसाममध्ये व्यापक आंदोलन सुरु आहे. या विधेयकाच्या विरोधात अनेक लोक रस्त्यावर उतरले असून आंदोलन नियंत्रित आणण्याच्या उद्देशाने मोठा फौजफाटा आसाम-त्रिपुरामध्ये तैनात करण्यात आला आहे.  एनआयच्या वृत्तानुसार, त्रिपुरा आणि आसाममध्ये प्रशासनाने आतापर्यंत तीन सेना तुकड्या पाठवण्याची मागणी केली होती.

 

आश्रय देणार त्यांना मतदानाचा हक्क मिळणार का?- संजय राऊत

त्रिपुरासाठी दोन तुकड्या तर आसामसाठी तिसरी तुकडी मागवण्यात आली होती.  केंद्राने बुधवारी आसाम सहित पूर्वोत्तर राज्यांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ५००० जवानांना विमानाने पाठवण्यात आले आहे. काश्मीरमधून जवळपास २० कंपन्या (२००० जवानांची तुकडी) परत बोलवण्यात आली असून या तुकड्या पूर्वोत्तर भागात पाठवण्यात आल्या आहेत.

Citizenship Bill : मला विश्वास आहे की हा कायदा संपुष्टात येईल - चिदंबरम

५ ऑगस्टपासून कलम ३७० च्या अनुषंगाने जम्मू काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलेला फौजफाटा त्रिपुरा आणि आसाम याठिकाणी पाठवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  ३० कंपन्यांना अन्य ठिकाणाहून पूर्वोत्तर राज्यांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात केंद्रीय राखीव पोलीस दर (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) च्या जवानांचा समावेश आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Citizenship Ammendment Bill 2019 Citizenship Bill Protests Army deployed In Tripura 5000 Personnel In Northeast