पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत; मोदी सरकारची अग्निपरीक्षा

राज्यसभा

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर आज ते राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. तब्बल १२ तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले होते. त्यामुळे आता राज्यसभेत देखील मोदी सरकारला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. केंद्र सरकारकडून विधेयक मंजूर करण्यासाठी जोर दिला जात आहे. विधेयकाच्या बाजुने बहुमत मिळावे यासाठी सरकारच्या अनेक बैठका झाल्या. तर, सत्ताधारी भाजपने राज्यसभेतील खासदारांना व्हिप जारी केला आहे.

माजी CM फडणवीसांना शिवसेनेकडून ही अपेक्षा

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला काँग्रेसचा आधीपासून विरोधच आहे. लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने आपली भूमिका बदलली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, जोपर्यंत लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत शिवसेना राज्यसभेत या विधेयकाला पाठिंबा देणार नाही. तसंच जनता दलने देखील लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला होता. मात्र आता या पक्षात नारीजाचा सूर असल्यामुळे जनता दल देखील या विधेयकाला राज्यसभेत विरोध करेल अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे राज्यसभेत विधेयक मांडतांना तीव्र आक्षेप, गोंधळ होण्याची शक्यता आहे. 

भाजप-सेना दुरावा कायमचा नाही, माजी मुख्यमंत्र्यांना युतीचा

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सोमवारी रात्री उशिरा लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकाच्या बाजूने ३११ खासदारांनी मतदान केले तर विरोधामध्ये ८० खासदारांनी मतदान केले. लोकसभेत काँग्रेसने या विधेयकाला विरोध केला. तर, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी या विधेयकाची प्रत फाडली होती. दरम्यान, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भातील तरतूद नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामध्ये करण्यात आली आहे. 

CM उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खडसे म्हणाले की,...