पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमित शहा लोकसभेत मांडणार नागरिकत्व दुरुस्ती विधेयक

अमित शहा

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडणार आहेत. विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला आहे. लोकसभेच्या दैनिक कामकाजानुसार नागरिकत्व सुधारणा विधेयक सूचीबध्द करण्यात आले आहे. यासाठी भाजपने आपल्या खासदारांना तीन दिवसांसाठी व्हिप जारी केला आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरण: सात पोलिसांचे निलंबन

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना यापुढे स्थलांतरित मानले जाणार नाही. त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. सोमवारी लोकसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुपारी हे विधेयक मांडतील. 

धक्कादायक! बिहारमध्ये विद्यार्थिनिला घरात घुसून जिवंत जाळले

या विधेयकामध्ये गेल्या साठ वर्षापासून लागू असलेल्या नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती आहे. या विधेयकावर लोकसभेत चर्चा होईल त्यानंतर त्याला मंजुरी दिली जाईल. या विधेयकाला विरोधी पक्ष तसंच शिवसेनेने देखील विरोध केला आहे. तसंत, ईशान्य राज्यामध्ये सुध्दा या विधेयकाला विरोध केला जात आहे. या भागातील जनता आणि काही संघटना एकत्र येत या विधेयकाविरोधात आंदोलन सुध्दा करत आहेत. 

अमृता फडणवीस अन् प्रियांका चतुर्वेदी यांच्यात जुंपली