पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक: PM मोदींकडून अमित शहांचे कौतुक

पंतप्रधान नरेंद मोदी आणि गृहमंत्री अमित शहा

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. विधेयक सादर होताना सभागृहात विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक आक्षेपावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाधानकारक उत्तर दिले. याबद्दल मोदींनी अमित शहा यांचे कौतुक केले आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर मोदींनी ट्विट करत अमित शहांचे कौचुक केले.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, 'अमित शहा यांनी लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ बद्दल सविस्तर माहिती दिली. मी यासाठी अमित शहाचे कौतुक करू इच्छितो. अमित शहांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्य प्रत्येक प्रश्नांचे सविस्तर उत्तर दिले.', असे मोदींनी सांगितले.

ओवेसींनी संसदेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडली

तर दुसऱ्या आणखी एका ट्विटमध्ये मोदींनी असे म्हटले आहे की, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ लोकसभेत मंजूर झाले आहे. या विधेयकावर महत्वपूर्ण चर्चा झाली. या विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या सर्व सदस्यांचे मी आभार मानतो. हे विधेयक भारताच्या परंपरांना अनुसरून आहे, असे मोदींनी सांगितले. 

बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर;चंद्रकांत पाटील म्हणाले,त्या आजारी

दरम्यान, तब्बल १२ तासांच्या चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकाच्या बाजूने ३११ खासदारांनी मतदान केले तर विरोधामध्ये ८० खासदारांनी मतदान केले. या विधेयकाला काँग्रेसने विरोध केला. तर, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी या विधेयकाची प्रत फाडली. दरम्यान, बुधवारी हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. 

फडणवीस सरकारने कोट्यवधी रुपयांचा 'निर्भया निधी' वापरलाच

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:citizenship amendment bill pm narendra modi specially applaud home minister amit shah speech