पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAB : राज्यसभेत मतदानावेळी शिवसेनेचा सभात्याग, राऊत म्हणाले...

संजय राऊत

लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत सभात्याग करुन विधेयकाला विरोध दर्शवला. लोकसभेतील भूमिकेनंतर काँग्रेसने शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली होती. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेत विधेयकाचे समर्थन करणार नाही असे स्पष्ट केले होते. 

राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक १२५-१०५ अशा फरकाने मंजूर

त्यांच्या या भूमिकेवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. शिवसेना राज्यातील सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसच्या दबावात असल्याचे ते म्हटले होते. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला शिवसेनेने सर्वप्रथम विरोध दर्शवला होता. भाजपसोबतची युती तोडल्यानंतर लोकसभेत शिवसेना या विधेयकाच्या विरोधात मतदान करेल किंवा तटस्थ राहील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र लोकसभेत शिवसेनेने विधेयकाचे समर्थन केल्याचे पाहायला मिळाले. 

आश्रय देणार त्यांना मतदानाचा हक्क मिळणार का?- संजय राऊत

राज्यसभेत विधेयकाला केलेला विरोध हा काँग्रेसच्या दबावामुळे घेतल्याच्या चर्चेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना हा स्वतंत्र पक्ष असून आम्ही पक्षाची भूमिका घेतली आहे. महाआघाडीसोबत असल्याने आम्ही सभात्याग करुन विरोध दर्शवलेला नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Citizenship Amendment Bill Maha Vikas Aghadi govt not affect We are an independent political party says Sanjay Raut Shiv Sena party boycotting voting in Rajya Sabha