पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानमधून आलेल्या हिंदूंना सुविधा देण्याच्या तयारीत केंद्र सरकार

संसद

केंद्र सरकार पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या हिंदूंसह ६ अल्पसंख्याक समूहाच्या लोकांना भारतीय नागरिकांप्रमाणे प्रत्येक आवश्यक त्या सुविधा व सरकारी सवलती पुरवणार आहे. सध्या या लोकांना सुविधा देण्यासाठी निश्चित असलेली कालमर्यादा संपवली जाणार आहे. यापूर्वी ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत किंवा त्यापूर्वी आलेल्या लोकांकडे वैध दस्ताऐवज नसतानाही भारतात राहण्यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले होते. 

२० वर्षांपूर्वी युद्धप्रसंगीच कारगिलला भेट दिली होती: PM मोदी

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, शेजारील देशातील छळामुळे भारतात येण्यास भाग पडलेले हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन धर्माच्या लोकांना सुविधा देण्यासाठी कालमर्यादा नसेल, असे उच्च स्तरावर ठरवण्यात आले आहे. राज्यांना याबाबत लवकरच निर्देश दिले जातील. नागरिकता संशोधन विधेयकातच अशा पद्धतीच्या तरतुदींचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

पुन्हा हिंमत करु नका, नाहीतर..,लष्करप्रमुखांचा पाकला इशारा

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची प्रतिक्षा

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची अद्याप प्रगती झालेली नाही. यावर सहमती करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या दुरुस्ती विधेयक २०१९ चा मुख्य उद्देश हा बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील ६ अल्पसंख्यक समाजांना भारतीय नागरिकत्व प्रदान करणे आहे.

सुमारे ३० हजार लोकांना फायदा होण्याची अपेक्षा

नवीन विधेयक नागरिकत्व कायदा १९५५ मध्ये दुरुस्तीसाठी तयार करण्यात आले आहे. या विधेयकाचा कायदा केल्यानंतर अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन धर्म मानणाऱ्या अल्पसंख्यक समुदायाला १२ वर्षांऐवजी ६ वर्षे भारतात व्यतीत केल्यानंतर आणि योग्य दस्ताऐवजाशिवाय भारतीय नागरिकत्व प्रदान केली जाईल. जोपर्यंत त्यांना नागरिकत्व मिळत नाही, त्यांना दीर्घावधी व्हिसा आणि कार्यकारी आदेशांच्या आधारावर सुविधा मिळत राहतील. भाजपने २०१४ च्या निवडणुकीत हे आश्वासन दिले होते. २०१९ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी या विधेयकाप्रती आपली प्रतिबद्धता असल्याचे म्हटले.

कारगिल सारखी चूक पाक पुन्हा करणार नाही : लष्कर प्रमुख

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:citizenship amendment bill Centre Ready To Give All facility To Those Hindu Who Came From Pakistan