पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागरिकत्व सुधारणा विधेयक आंदोलन: पोलीस फायरिंगमध्ये दोघांचा मृत्यू

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला आसाममधून जोरदार विरोध होत आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. मात्र दुसरीकडे या विधेयकाच्या विरोधात आसाममध्ये तीव्र आंदोलन सुरुच आहे. गुवाहटी येथे आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या दोघांचा गुरुवारी मृत्यू झालाय. 

नागरिकत्व विधेयक: बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांचा भारत दौरा रद्द

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गुवाहटी वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाला होता तर एकाने रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांनी लोकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या विरोधात काही तक्रार असेल तर आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका, असे राज्यपालांनी म्हटले आहे.   

आसाममध्ये संतप्त निदर्शने, संचारबंदी लागू, लष्कर तैनात

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ईशान्य भारतात सर्वत्र असंतोषाचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर याठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी बुधवारी आसामच्या रस्त्यांवर उतरलेल्या हजारो लोकांचा पोलिसांशी संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. कुठल्याही पक्षाने किंवा विद्यार्थी संघटनेने बंदचे आवाहन केलेले नसले, तरी बहुसंख्य विद्यार्थ्यी आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.