पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेशिवाय अशा पद्धतीने भाजपने राज्यसभेत आपले आकडे वाढवले...

राज्यसभा

राज्यसभेत बहुमत नसतानाही बुधवारी नागरिकत्व सुधारणा विधेयक भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारने सभागृहात सहजपणे मंजूर करून घेतले. विशेषतः भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने आता महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केलेला असतानाही शिवसेनेचा कमतरता न जाणवू देता भाजपने इतर पक्षांची मदत घेऊन आपले काम फत्ते केले. दुसरीकडे सर्व विरोधकांना एकत्र आणून सरकारचा राज्यसभेत पराभव कऱण्यात काँग्रेस पुन्हा एकदा अपयशी ठरला. संयुक्त जनता दलाने आणि बिजू जनता दलाने या विधेयकाचे समर्थन केल्यामुळे सरकारचे काम सोपे झाले.

काहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले: आशिष शेलार

शिवसेनेने लोकसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान केले होते. पण काँग्रेसने दबाव टाकल्यावर राज्यसभेत शिवसेनेने विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली. अर्थात शिवसेनेने विरोधात मतदान केले नाही. मतदानावेळी शिवसेनेने सभागृहातून सभात्याग केला. त्यामुळे सरकारचे काम आणखी सोपे झाले. शिवसेना राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान करणार नसल्याचे लक्षात आल्यावर भाजपने इतर पक्षांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आणि विधेयक मंजूर करून घेतले. कलम ३७० रद्द करण्याचे आणि नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करून घेण्यामुळे राज्यसभेत भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. 

GDP घटण्याची चिंता नाही, प्रणव मुखर्जींचे महत्त्वपूर्ण विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकावेळी शिवसेनेने बाजूने मतदान केले नाही. ही स्वागतार्ह घटना आहे. मला यामुळे आनंद झाला असल्याचे सांगितले.