पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागरिकत्व कायद्याविरोधात जयराम रमेश सुप्रीम कोर्टात

जयराम रमेश

संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ विरोधात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. जयराम रमेश यांनी या कायद्याविरोधात शुक्रवारी याचिका दाखल केली आहे. या कायद्याच्या वैधतेला त्यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे.

तत्पूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी नागरित्व विधेयकाला मंजुरी दिली होती. त्यानंतर हा कायदा अस्तित्वात आला आहे. एका अधिकृत अधिसूचनेनुसार गुरुवारी अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर हा कायदा लागू झाला आहे.

मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावरुन तरुणीने उडी मारली

या कायद्यानुसार हिंदू, शीख, बौद्ध, जैवन, पारशी आणि ख्रिश्चन समाजाचे जे सदस्य ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आले आहेत. ज्यांना आपल्या देशात धार्मिक छळाला सामोरे जावे लागले, त्यांना अवैध प्रवासी मानले जाणार नाही. त्यांना भारतीय नागरित्व दिले जाईल.

भाजपचे काही नेते आमच्या संपर्कात: नवाब मलिक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Citizenship Amendment Act 2019 congress leader jairam ramesh approaches the Supreme Court