पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ओवेसी सुप्रीम कोर्टात

असदुद्दीन ओवेसी

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला संसदेत मंजुरी मिळाल्यानंतर आणि कायदा तयार झाल्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये हिंसाचार सुरु झाला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात विरोधी पक्षांपासून ते विद्यापीठांचे विद्यार्थी रस्त्यावर उतरुन विरोध करत आहेत. याचदरम्यान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

मी मरण पत्करेल पण माफी मागणार नाही: राहुल गांधी

'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, वकील निजाम पाशा म्हणाले की, एमआयएम नेता ओवेसी यांनी नागरिकत्व दुरुसती कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. 

शिवसेनेने मूळ बाणा दाखवावा, भीतीची गरज नाहीः आशिष शेलार

संसदेतही ओवेसी यांनी या कायद्याला विरोध करत या विधेयकाची प्रत फाडली होती. तर दुसरीकडे इंडियन यूनियन मुस्लिम लीगनेही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Citizenship Amendment Act 2019 AIMIM leader Asaduddin Owaisi filed a petition before the Supreme Court challenging the Citizenship Amendment Act