पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली आंदोलन: काही मेट्रो स्टेशन सुरु, वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण

दिल्ली आंदोलन

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात गुरुवारी देशभरामध्ये भारत बंदची हाक देण्यात आली आहे. डावे पक्ष आणि मुस्लिम संघटनांनी हा बंद पुकारला आहे. दिल्लीमध्ये या कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामुळे दिल्ली पोलिसांनी मध्य आणि जुन्या दिल्लीतील जवळपास १८ रेल्वे स्टेशन बंद केले होती. मात्र प्रवाशांची गैरसोय आणि गर्दीची वेळ पाहता काही मेट्रो स्टेशन सुरु करण्यात आले आहेत. पण, काही मेट्रो स्टेशन अजूनही बंद आहेत. तसंच या आंदोलनामुळे दिल्लीतील अनेक भागांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहेत.

भाजपला पर्याय हवाय पण देशात राहणारा, शरद पवारांचा राहुल गांधींना टोला

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारपर्यंत दिल्लीतील १८ मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली होती. मात्र गर्दीच्या वेळी काही मेट्रो स्टेशन सुरु करण्यात आले आहेत. चांदणी चौक, बाराखंबा, मंडी हाऊस, प्रगती मैदान, जामा मस्जिद, दिल्ली गेट, आयटीओ, जनपथ, खान मार्केट, वसंत विहार हे मेट्रो स्टेशन सुरु करण्यात आले आहेत. तर इतर मेट्रो स्टेशन अद्याप बंद आहेत. आंदोलनामुळे दिल्लीतील मेट्रो स्टेशन बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते. 

..तर परवेझ मुशर्रफ यांनाही नागरिकत्व मिळावं: सुब्रमण्यम

नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन पाहता दिल्लीच्या अनेक भागांमध्ये मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र ५ तासांनंतर मोबाईल सेवा सुरु करण्यात आली आहे. आंदोलनामुळे दिल्ली पोलिसांनी मोबाईल कंपन्यांना फोन आणि मॅसेज सेवा बंद करण्याचे आदेश दिले होते. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनामुळे ठिकठिकाणी वाहतूकीची कोंडी झाली आहे. दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेसवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांकडून एक्स्प्रेसवर गाड्यांची तपासणी केली जात आहे.

प्लीज, सनाला यापासून दूर ठेवा; सौरव गांगुलींची विनंती

दिल्लीतील लालकिल्ला परिसरामध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे तसंच या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला आहे. लाल किल्ला परिसरात आंदोलनात सहभागी झालेल्या जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याच्यासह अनेक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लालकिल्ला परिसरातून आतापर्यंत ७०० आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 IPL Auction 2020 Live : कोणत्या खेळाडूला मिळणार तगडी किंमत?