पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिन्मयानंद प्रकरणः आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीची होणार चौकशी

चिन्मयानंद प्रकरणः आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीची होणार चौकशी

माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीची एसआयटीकडून चौकशीची तयारी सुरु आहे. विद्यार्थिनीने न्यायालयात मंगळवारी सकाळीच अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी सुरु आहे. एसआयटी यावेळी जिल्हा न्यायालय परिसरात विद्यार्थिनीबरोबर उपस्थित आहे. या विद्यार्थिनीने आपल्या मित्राच्या मदतीने चिन्मयानंद यांच्याकडून ५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

सोशल मीडियासाठी नियम तयार करताना समतोल साधा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

यापूर्वी, सोमवारी विद्यार्थिनीने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या पीठासमोर आपल्या अटकेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने पीडितेला दिलासा हवा असेल तर तिने योग्य त्या पीठासमोर नवीन याचिका दाखल करावी, असा सल्ला दिला. हे पीठ केवळ या प्रकरणाची निगराणी करण्यासाठी स्थापित करण्यात आले आहे. जर अटकेपासून स्थगिती हवी असेल तर तसा आदेश संमत करणे आमच्या अधिकाराबाहेर आहे, असे न्यायालयाने म्हटले.

तुमची हिंमत कशी झाली? १६ वर्षांच्या कार्यकर्तीचा नेत्यांना सवाल

दरम्यान, एसआयटीच्या चौकशीत विद्यार्थिनी आणि चिन्मयानंद यांच्याबाबत अनेक आश्चर्यजनक खुलासे समोर आले आहेत. आरोप करणारी विद्यार्थिनी आणि चिन्मयानंद यांच्यात जानेवरी २०१९ ते ऑगस्ट महिन्यात सुमारे २०० वेळा फोनवर बोलणे झाले आहे. तर दुसरीकडे ८ महिन्यात विद्यार्थिनी आणि तिचा सहकारी संजय यांच्यात ४२०० पेक्षा जास्त वेळा फोनवर चर्चा झाली होती.

इम्रान खान यांचा कबुलनामा: पाकिस्तानी सैन्यांनी अल कायदाला दिले प्रशिक्षण