पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वामी चिन्मयानंद ब्लॅकमेल प्रकरणातील विद्यार्थीनीची जामीनावर सुटका

स्वामी चिन्मयानंद यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणात अटकेत असलेल्या विद्यार्थीनीची जामीनावर सुटका

Chinmayanand case : अलाहाबाद उच्च न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना ब्लॅकमेल करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या विद्यार्थीनीचा जामीन अर्ज मंजूर केला. न्यायमूर्ती एसडी सिंह यांनी यासंदर्भातील आदेश दिले. विधी अभ्यासाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीच्यावतीने ज्येष्ठ वकील रविकिरण जैन आणि राज्य सरकारचे अधिवक्ता एसके पाल तर चिन्मयानंद यांच्यावतीने अधिवक्ता दिलीप कुमार यांनी कोर्टात युक्तीवाद केला.   

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या: खासदार संभाजीराजे

रविकिरण जैन म्हणाले की, स्वामी चिन्मयानंद फार दिवसांपासून संबंधित विद्यार्थीनीवर अत्याचार करत होते. तिला ब्लॅकमेलच्या आरोपात अडकवण्यात आले आहे. विद्यार्थीनीचा छळ करुन तिला आरोपी सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याप्रकरणाची विशेष चौकशी पथकानेही व्यवस्थित चौकशी केलेली नाही. 

पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राहुल गांधी म्हणाले,...

स्वामी चिन्मयानंद यांची बाजू मांडताना दिलीप कुमार म्हणाले की, आरोपी विद्यार्थीनींने आपल्या मित्रांच्या साथीने पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. जर पैसे दिले नाही तर बदनामी करेन अशी धमकी देण्यात आली होती. यासंदर्भातील पुरावे विशेष चौकशी पथक (एसआयटी) कडे सोपवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकल्यानंतर कोणतेही मत न देता न्यायमूर्तींनी विद्यार्थीनीचा जामीन अर्ज मंजूर केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Chinmayanand case Law student granted bail by Allahabad High Court who was arrested for blackmailing swami Chinmayanand