पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीनचे ते जहाज पाकला निघाले होते, पण दिल्लीतून फोन आले आणि...

कांडला बंदरावर पकडण्यात आलेले ते जहाज

गुजरातमधील कांडला बंदरामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या चीनच्या जहाजाबद्दल नवी माहिती मिळाली आहे. या जहाजामध्ये क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणारे उपकरण (ऑटोक्लेव्ह) होते. पण त्याची माहिती देण्यात आली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर हे जहाज ताब्यात घेण्यात आले होते. हे जहाज पाकिस्तानातील कासीम बंदराकडे निघाले होते. 

कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट, चीनमधील मृतांचा आकडा २००० पार

कांडला बंदरावर आल्यावर ४ तारखेच्या रात्री या जहाजाकडे पुढील प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे असल्यामुळे त्याला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली होती. हे जहाज पुढील प्रवासासाठी निघणारही होते. पण तितक्यात राजधानी दिल्लीत सूत्रे हालली आणि पुढील घडामोडी वेगाने घडल्या. कांडला बंदरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्लीतून फोन आले. महसूल गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी कांडला बंदरावर पोहोचले. त्याचबरोबर इतरही राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी कांडला बंदरावर पोहोचले. हे जहाज रोखून धरण्यात यावे, अशा सूचना कांडला बंदरावरील अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

कांडला बंदरावरील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, या जहाजाची सर्व कागदपत्रेही जप्त करण्यात आलेली असू शकतात. आता जहाजावर पुढील काय कारवाई केली जाणार हे केंद्र सरकारवर अवलंबून आहे.

कोरोनामुळे HSBC करणार ३५००० कर्मचाऱ्यांची कपात

कांडला बंदराजवळ थांबविण्यात आलेल्या या जहाजाची तपासणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. चीनमधील जिआनजीन बंदरातून हे जहाज निघाले होते. ते पाकिस्तानमधील कासीम बंदराच्या दिशेने चालले होते. या जहाजावर हाँगकाँगचा ध्वज होता. त्यामध्ये नेमक्या कोणत्या वस्तू आणि उपकरणे आहेत, याची चुकीची माहिती देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सीमा शुल्क खात्याकडून कारवाई करण्यात आली आहे. आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागण्यासाठी आटोक्लेव्ह या उपकरणाचा वापर केला जातो.